Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीअनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता...

अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन..

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.

तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण करणेसाठी ३१ जानेवारी, २०२२ ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून या तारखेत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी,असे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments