Thursday, September 28, 2023
Homeउद्योगजगतकामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कामगारांची वज्रमुठ-डॉ. कैलास कदम

कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कामगारांची वज्रमुठ-डॉ. कैलास कदम

राष्ट्रीय संपात पिंपरी चिंचवड मधील हजारो कामगार सहभागी

८ जानेवारी २०२०,
देशभरातील कोट्यावधी कामगारांचे हित दुर्लक्षित करुन भांडवलदारांना पुरक ठरतील असे कायदे केंद्र सरकार करीत आहे. या कायद्यांमुळे ‘कामगार’ ही संज्ञा नष्ठ होईल. कंत्राटी कामगार कायदा, ‘निम’ कायदा, लर्न ॲण्ड अर्न असे कायदे कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करणारे आहेत. तसेच 2016 साली केंद्र सरकारने लागू केलेला ‘एनसीएलटी’ (NATIONAL COMPANY OF LAW TRIBUNAL) कायदा रद्द करुन पुर्वीचाच ‘बीआयएफआर’ (BEAURO OF INDUSTRIAL FINANCIAL RESTRUCTCURE) हाच कायदा अंमलात आणावा. या व इतर मागण्यांसाठी बुधवारी, 8 जानेवारी 2020 ला सर्व संघटीत, असंघटीत कामगारांचा देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला होता. या संपात देशभरातील बारा राष्ट्रीय कामगार संघटनांसह इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एआययूटीसीयू, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटी यूसी, या संघटना सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगार संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. त्यानिमित्त कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अर्पण करण्यात आला. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, इंटकचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग गडेकर, कामगार नेते माधव रोहम, अनिल रोहम तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सरकारी, निमसरकारी, केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत आस्थापनातील कर्मचारी आणि पिंपरी चिंचवड, भोसरी, तळेगाव, लोणावळा, चाकण, राजगुरुनगर औद्योगिक पट्यातील कामगार बुधवारी सकाळी 10 वाजता दुचाकी रॅलीने पुण्यातील वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले. तेथून पुढे 11:30 वाजता पायी मोर्चा पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments