Tuesday, December 10, 2024
Homeताजी बातमीपत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ...

पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ

पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड च्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (दि.19) सकाळी 9 वाजता निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. यावेळी ‘पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड’कडून ‘महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ‘लोकशाही मराठी’चे संपादक कमलेश सुतार, ‘एबीपी माझा’चे राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अव्दैत मेहता, न्यूज 18 लोकमतचे गोविंद वाकडे यांच्यासह 12 ज्येष्ठ पत्रकारांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे.

कार्यक्रमात पहिल्या सत्रात सकाळी 9.30 ते 11 यावेळेत ‘मी आणि पत्रकार हक्काची लढाई…’ या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रामध्ये दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे, दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे संपादक सुनील माळी, सीविक मिररचे संपादक अविनाश थोरात, पत्रकार संदीप महाजन, न्यूज 18 लोकमतचे (गडचिरोली) महेश तिवारी हे सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक विठ्ठल नाना काटे, राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे. दैनिक महाराष्ट टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार, एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता, दैनिक पुण्यनगरीचे अनिल मस्के,पत्रकार डिजीटल मीडिया अमित मोडक, पत्रकार संदीप महाजन, दैनिक लोकमत (यवतमाळ) अविनाश खंदारे, न्युज स्टेट महाराष्ट्र असो. एडिटर अश्विनी सातव -डोके, ‘पोलीसनामा’चे मुख्य संपादक नितीन पाटील, दैनिक पुढारी (पुणे) आशिष देशमुख, न्यूज 18 लोकमत (गडचिरोली) महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत (पिंपरी चिंचवड) गोविंद वाकडे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तिसऱ्या सत्रामध्ये ‘पत्रकार हल्ला विरोधी कायदा, वास्तव आणि गरज’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रामध्ये दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे (मुंबई) संपादक पराग करंदीकर, लोकशाही मराठीचे (मुंबई) संपादक कमलेश सुतार, टाईम्स नाऊ मराठीचे संपादक मंदार फणसे, बी.बी.सी मराठीचे संपादक आशिष दीक्षित, दैनिक सकाळचे (मुंबई ब्युरो चिफ) विनोद राऊत, एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखक निवेदिका वसुंधरा काशीकर करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments