Tuesday, February 27, 2024
Homeबातम्याकोरियन व्लॉगर तरुणीसोबत गैरवर्तन करणाऱया तरुणाला गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या…

कोरियन व्लॉगर तरुणीसोबत गैरवर्तन करणाऱया तरुणाला गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या…

अतिथी देवो भव असं भारतात नेहमीच म्हटले जाते. मात्र, त्याच अतिथीसोबत गैरवर्तन केल्याचं प्रकरण पिंपरी-चिंचवड मधून समोर येत आहे. कोरियन व्लॉगर तरुणी सोबत गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पिंपरी- चिंचवडमधील असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने त्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

कोरियन व्लॉगर तरुणीसोबत पिंपरी- चिंचवड शहरातील तरुणाने गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पिंपरी- चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने तपास करत गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. दिवाळी सणादरम्यान कोरियन व्लॉगर तरुणी शहरात आली होती. मोबाईलवर ती रेकॉर्डिंग करत असतांना – व्हिडिओ घेत असताना अचानक एक तरुण तिच्या खांद्यावर आणि गळ्यात हात टाकतो आणि गैरवर्तन करतो असं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ही तरुणी काही क्षण घाबरल्याचं दिसत आहे. तात्काळ त्या ठिकाणाहून त्या सर्वांना नमस्कार करून ती तिथून निघून जाते. मात्र आता व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तरुणाला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments