Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीमुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पुन्हा अपघात : कंटेनरची गाड्यांना धडक ; दोनजण जागीच...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पुन्हा अपघात : कंटेनरची गाड्यांना धडक ; दोनजण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात. या अपघातामध्ये गाड्यांचा चेंंदामेंदा झाला आहे. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई एक्स्प्रेस हायवेवर पुन्हा अपघात झाला आहे. किमी ३५ जवळ हा अपघात झाला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना हा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. कंटेनर हा मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाला. सकाळी ९ वाजता हा अपघात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार सकाळी ९ च्या सुमारास एम एच ४६ ए आर ०१८१ हा कंटेनर पुण्याकडून मुंबईकडे जात होता. पुढे जाताना किलोमीटर ३५ जवळ आल्यावर हा कंटेनर मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाला. या अपघातात पाच चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कारमधील १ महिला आणि चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथील दाखल करण्यात आले आहे.

सध्या मुंबईकडे जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुणे दिशेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने असून अपघात झालेली वाहने बाजूला काढताना काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आलेली होती. मात्र, आता यावेळी वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. या हायवेवर अपघात होत असतात. रस्ते प्रशासनाकडून यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा कंटेनर उलटल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आता पोलिस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पाऊस सुरू असल्याने वाहने सावकाश चालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments