केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २०२३ साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयसीसी वर्ल्डकप २०२३मध्ये भारताने शानदार कामगिरी केली होती, ज्यात मोहम्मद शमीने स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट घेतल्या होत्या. शमी सोबत अन्य २५ खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आली आहे. यात पॅरा अॅथलीट शीतल देवीचा देखील समावेश आहे. या सर्वांना ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जातील.
बॅडमिंटनमध्ये शानदार कामगिरी करणारे सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची खेल रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मेजर ध्यानचंद खेल रत्न हा भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. २३ वर्षीय सात्विक आणि २६ वर्षीय चिराग यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. या जोडीने २०२३ मँध्ये स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन, कोरिया ओपन आणि चायना मास्टर्सचे विजेतेपद जिंकले आहे.
अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू
ओजस प्रवीण देवताळे (तिरंदाजी)
अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
श्रीशंकर एम (एथलेटिक्स)
पारूल चौधरी (एथलेटिक्स)
मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
आर वैशाली(बुद्धिबळ)
मोहम्मद शमी (क्रिकेट)
अनुश अग्रवाल (घोडेस्वारी)
दिव्यकृती सिंह(घोडेस्वारी ड्रेसेज)
दीक्षा डागर (गोल्फ)
कृष्ण बहादुर पाठक (हॉकी)
पुखरामबम सुशील चानू (हॉकी)
पवन कुमार (कबड्डी)
रितु नेगी (कबड्डी)
नसरीन (खो-खो)
पिंकी (लॉन बाउल्स)
ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर (शुटिंग)
ईशा सिंह (शुटिंग)
हरिंदर पाल सिंह संधू (स्क्वॅश)
अयहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
सुनील कुमार (कुस्ती)
अंतिम (कुस्ती)
नाओरेम रोशिबिना देवी (वुशु)
शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
इलूरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
प्राची यादव (पॅरा कैनोइंग)