३ जानेवारीं २०२०,
#पुन्हा निवडणूक, असे ट्विट करत ऐन निवडणुकीच्या काळात ‘धुरळा’ चित्रपटाच्या कलाकारांनी ट्विट केल्यामुळे सोशल मीडियावर बराच गोधळ झाला होता, तेंव्हा पासूनच ‘धुरळा’ या चित्रपटाविषयी अवघ्या महाराष्ट्रला उत्सुकता लागलेली आहे.
मागील काही वर्षांपासून झी टॉकीज आपली परंपरा कायम ठेवत, नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात ‘धुरळा’ हा चित्रपट आज पासून प्रदर्शित करत आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’ हा राजकीय कथानकावर आधारित असून, ‘धुरळा’ हा मल्टिस्टारर चित्रपट आहे यामध्ये अलका कुबल, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, प्रसाद ओक, हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.