Saturday, March 22, 2025
Homeगुन्हेगारीअनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; १५ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; १५ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली. दरम्यान आज त्यांची कोठडी संपल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होत आहे.

अनिल देशममुखांना १५ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. दरम्यान, त्यांची कोठडी संपल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments