आदित्य आणि अनन्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, आजपर्यंत या अफवांवर कोणत्याही या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु कोणीही त्यांचं नातं नाकारलेलंही नाही.
बॉलिवूडची प्रसिद्ध स्टारकिड अनन्या पांडे सध्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रंगत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, त्यानंतर सर्वजण आदित्य आणि अनन्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, आजपर्यंत या अफवांवर कोणत्याही या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु कोणीही त्यांचं नातं नाकारलेलंही नाही. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अनन्याने तिच्या डेटिंग लाइफबद्दल मोठा खुलासा केला आहे.
अनन्या पांडे आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. या सर्वांची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये ‘अनन्या आणि आदित्य त्याच्या पार्टीमध्ये एका कोपऱ्यात बसून गप्पा मारत होते’ असा खुलासा केला. यानंतर हे दोघे अनेक बी-टाऊन पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले, ज्यामध्ये त्यांच्या केमिस्ट्रीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून पदार्पण करणारी अनन्या पांडेने तिच्या रिलेशनशिपबाबत नेहमीच मौन बाळगलं आहे. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या डेटिंग लाइफशी संबंधित मोठा खुलासा केला आहे
नुकत्याच झालेल्या या मुलाखतीत अनन्याला आदित्यसोबतच्या डेटिंगच्या अफवांवर विचारण्यात आले तेव्हा तिने मौनच बाळगलं. पण, अनन्या पांडे याविषयी बोलताना पुढे म्हणाली, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणे ही चांगली गोष्ट आहे, मी कोणाला डेट करत आहे याचा अंदाज लोकांनी लावला पाहिजे. पण मी लग्नासाठी अजून खूप लहान आहे. त्यामुळे माझा लग्नाबाबत कोणताही प्लॅन नाही.’ असा खुलासा तिने केला आहे. तथापि, अभिनेत्रीला या क्षणी तिच्या डेटिंग जीवनापेक्षा तिच्या करिअरवर अधिक लक्ष द्यायचं आहे. गेल्या काही वर्षांत तिचे चित्रपट सातत्याने फ्लॉप ठरले आहेत, त्यामुळं वैयक्तिक आयुष्यापेक्षा अनन्याला सध्या करिअर जास्त महत्वाचं वाटतं.