Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीअनंत-राधिकाच्या लग्नात किम कार्दशियन ते निक जोनास 'हे' हॉलिवूड सेलिब्रिटी राहणार उपस्थित

अनंत-राधिकाच्या लग्नात किम कार्दशियन ते निक जोनास ‘हे’ हॉलिवूड सेलिब्रिटी राहणार उपस्थित

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये जगभरातील सेलिब्रिटिंना बोलवलं आहे. इतकचं नव्हे तर या लग्न सोहळ्यात हॉलिवूड सेलिब्रेटीदेखील हजेरी लावणार आहेत. या लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार आहे, ते आपण जाणून घेऊया.

अनंत-राधिकाच्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन, माइक टायसन, जॉन सेना, निक जोनास हे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

हॉलिवूड सिनेसृष्टीतील कलाकार अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन मुंबईत दाखल झाल्या आहेत. तर निक जोनसदेखील पत्नी आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रासह मुंबईत आला आहे.

अनंत-राधिकाचं लग्न १२ जुलैला दुपारी ३ वाजता शुभ मुहूर्तावर होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या सगळ्या कार्यक्रमांना विविध ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments