Saturday, November 8, 2025
Homeताजी बातमीपाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हे महागद्दार – शिवाजी आढळराव पाटील

पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हे महागद्दार – शिवाजी आढळराव पाटील

पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हेच महागद्दार आहेत. अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केली आहे. ते पिंपरी- चिंचवडच्या भोसरीमध्ये जाहीर सभेत बोलत होते. भोसरीमध्ये आढळराव यांच्यासाठी प्रचारसभा आयोजित केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजी आढळराव पाटील, महेश लांडगे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

विरोधक अमोल कोल्हे यांना मतदारांनी गेल्या पंचवार्षिक ला दिल्लीत पाठवलं. कोल्हे पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसले नाहीत. मी पराभूत होऊन देखील पाच वर्षांपासून मतदारसंघात फिरत आहेत. विकास कामे करत आहे. अस आढळराव म्हणाले.

पुढे ते म्हणाले, कोल्हे यांना १५ – २० गावाच्या वेशीवर अडवलं. त्यांना नागरिकांनी जाब विचारला. तुम्ही आमच्यासाठी काय केलं. अशी विचारणा करण्यात आली. मतदारांनी कोल्हे यांना फोन केल्यानंतर त्यांचे पीए हे अमोल कोल्हे यांच्या आवाजात बोलतात. पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे यांनी आत्तापर्यंत पाच पक्ष बदलले आहेत. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार आणि शरद पवार गट अशा बेडूक उद्या त्यांनी घेतल्या. कोल्हे हेच खरे महागद्दार आहेत. अशी टीका शिवाजी आढळराव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments