१० एप्रिल २०२१,
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व लसीकरण केंद्रे आज शनिवार (दि.१०) सुरू राहणार आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’चे २० हजार डोस महापालिकेला आज मिळाले मिळाले आहेत. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. महापालिकेची ५९ आणि खासगी २८ अशी ८७ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत.या ८७ लसीकरण केंद्रावर शहरातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाते. परंतु, लसीचा साठा संपल्याने आज (दि.०९) दिवसभर सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. लसीकरण ठप्प झाले होते. महापालिकेला ‘कोव्हिशील्ड’चे २० हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे आज शनिवारी लसीकरण सुरू केले जाणार आहे. सर्व लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ५९ लसीकरण केंद्रामार्फत सुमारे १ लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. तर, खासगी २८ लसीकरण केंद्रामार्फत ५० हजार ७७७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.