Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकलसींचा साठा उपलब्ध नसल्याने उद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद...

लसींचा साठा उपलब्ध नसल्याने उद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील

१ जूलै २०२१,
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि.१६ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचारी (HCW), दि.०२ फेब्रुवारी पासून आघाडीचे कर्मचारी (FLW), दि.०१ मार्च २०२१ पासून ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच दि.०१ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि दि.०१ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड- १९ लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. कोविड १९ लस साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे शुक्रवार दि.०२ जूलै २०२१ रोजी बंद राहतील याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments