Sunday, September 8, 2024
Homeताजी बातमीराज्यातील सर्व शाळा दिवाळी नंतर चालू होणार

राज्यातील सर्व शाळा दिवाळी नंतर चालू होणार

१९ सप्टेंबर २०२०,

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

ज्या जिल्ह्यात दोन आकडी रुग्ण संख्या होती तेथे आता रुग्णांची संख्या चार आकड्यांवर गेलेली आहे… त्यामुळे शाळा सुरू झाल्या तर मुलांना याची लागण होईल. मुलांच्या माध्यमातून ही साथ त्यांच्या घरापर्यंत जाईल. हे होऊ द्यायचे नसेल तर शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवणे योग्य राहील, असे यावेळी सांगण्यात आले. राज्यातली एकही शाळा क्वारंनटाईनसाठी वापरली जात नाही, तसेच शिक्षकांच्या सेवा देखील मोठ्या प्रमाणावर आता कोरोनासाठी घेणे कमी झाले आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

आॅनलाइन शिक्षण घेण्यावरून यावेळी चर्चा झाली. अनेक भागात नेटवर्कचा प्रश्न आहे. त्यामुळे या शिक्षणाचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही, यावर जवळपास सर्व मंत्र्यांचे एकमत झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. मात्र दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांना रिकामे बसू न देता त्यांच्याकडून, त्यांच्या वयोगटानुसार, वेगवेगळ्या उपक्रम राबवून घेणे, अभ्यासक्रमांची ओळख कायम ठेवणे, या गोष्टी जाणीवपूर्वक शिक्षकांनी केल्या पाहिजेत.
पालकांनी देखील यात हातभार लावला पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय तुटणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments