Saturday, March 2, 2024
Homeआरोग्यविषयकपिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या रविवारी बंद राहणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या रविवारी बंद राहणार

१८ सप्टेंबर २०२१,
लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या (रविवारी) बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1988 अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड 19 या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी (HCW),2 फेब्रुवारीपासून आघाडीचे कर्मचारी (FLW), 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण तसेच 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षांवरील नागरिकांचे

लसीकरण आणि 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड 19 लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.उद्या (रविवारी) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत,

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments