Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वमाझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही – दिलीप चोरडिया

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही – दिलीप चोरडिया

चुकीच्या तक्रारींमुळे प्रकल्पात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न; आरोप फेटाळत चोरडिया यांचे स्पष्टीकरण

माझ्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही. काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक चुकीच्या तक्रारी करून प्रकल्पात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक तथा बांधकाम व्यावसायिक दिलीप चोरडिया यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना चोरडिया म्हणाले की, संबंधित प्रकरणात आम्ही कोणालाही धमकी दिलेली नाही. संबंधित व्यक्तीला आम्ही प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही. केवळ त्याच्या सांगण्यावरून चिंचवड येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये एकदा बैठक झाली होती. त्या बैठकीला माझ्यासोबत विनोद धुमाळ उपस्थित होते, मात्र कुणाल उपस्थित नव्हता. आमचा व्यवहार फुगे परिवार यांच्याबरोबर झाला होता.

धुमाळ यांना ६५० चौरस फुटांचा फ्लॅट देण्याचे ठरले होते. या व्यवहारात कोणताही रोख मोबदला देण्याचा विषय नव्हता. त्यामुळे आर्थिक फसवणुकीचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंधित जागा आजही धुमाळ यांच्या ताब्यात असून संपूर्ण जागेवर चाळ आहे. तेथील भाडेकरू तसेच धुमाळ कुटुंबीय त्या जागेत वास्तव्यास आहेत. त्यांनी जागा खाली करून दिलेली नाही. उलट, आम्ही रिकाम्या केलेल्या खोल्यांचाही ताबा त्यांनी घेतल्याचा दावा चोरडिया यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून मूळ मालकाशी चर्चा करून करार रद्द करण्याची तयारी आम्ही दर्शविली आहे. सुरुवातीच्या काळात धुमाळ यांना पर्याय म्हणून दुसऱ्या प्रकल्पात ९५० ते १००० चौरस फुटांचा तयार फ्लॅट देण्याची ऑफरही देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही.

गणेश फुगे कुटुंबीयांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगत चोरडिया यांनी संबंधित जागेचा सातबारा उताराही पत्रकारांना दाखविला. यावेळी गणेश फुगे आणि इतर फुगे परिवार उपस्थित होते.

दरम्यान, प्लॉटबाबत खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गणेश फुगे आणि दिलीप चोरडिया यांनी यावेळी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments