बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रिय स्थितीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना गुरुवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रिय स्थितीचे कमी दाबाच्या पट्टय़ात रुपांतर झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून गुरुवार, १४ सप्टेंबरपासूनच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जना आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.