Monday, December 4, 2023
Homeताजी बातमीग्राहकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी टॉयलेटमध्ये मोबाईल कॅमेरा बसवल्याबद्दल वेटरवर गुन्हा दाखल

ग्राहकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी टॉयलेटमध्ये मोबाईल कॅमेरा बसवल्याबद्दल वेटरवर गुन्हा दाखल

आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ टाकण्यासाठी हॉटेलच्या टॉयलेटमध्ये मोबाईल बसवल्याप्रकरणी एका वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालय वापरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला पिशवीमध्ये मोबाईल गुंडाळलेला दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्ती आकुर्डी येथील गीता पावभाजी हॉटेलमध्ये सहकाऱ्यांसोबत जेवायला गेली होती. मात्र, ती व्यक्ती टॉयलेट वापरण्यासाठी गेली असता त्याला कागदात काहीतरी गुंडाळलेले आढळले आणि त्यात मोबाईल पाहून त्याला धक्काच बसला. हॉटेलमधील ग्राहकांचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी हा मोबाईल ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) अन्वये त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन व्हिडिओ सापडले असून, संशयिताला न्यायालयात हजर करण्यात येईल . याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments