Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीआकुर्डीत बुधवारी श्री खंडेरायांचा उत्सव

आकुर्डीत बुधवारी श्री खंडेरायांचा उत्सव

२८ डिसेंबर,
आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा यांचा धार्मिक उत्सव बुधवार (दि. 1 जानेवारी) व गुरुवारी (दि. 2 जानेवारी) आकुर्डी खंडोबा मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

अशी माहिती श्री खंडोबा ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी आकुर्डी गाव, श्री खंडोबा उत्सव समिती यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. बुधवारी पहाटे 5 वाजता खंडोबा मंदिरात ‘श्रीं’ ना मंगल स्नान व महाअभिषेक सोहळा, रात्री 9 वाजता श्रींच्या पालखीची भव्य ग्राम प्रदक्षिणा, गुरुवारी सकाळी 9 वाजता श्री खंडोबा मंगल कार्यालयात लावण्य तारका हा सांस्कृतिक कार्यक्रम,
आकुर्डी गावातील वसंतदादा पाटील मराठी शाळेच्या पटांगणावर दुपारी 3 वाजता भव्य इनामी कुस्त्यांचा जंगी आखाडा असे कार्यक्रम होणार आहेत. भक्त भाविकांनी व कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात
आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments