Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीवाल्हेकरवाडी प्रभाग १७ मध्ये अजितदादांची प्रचार सभा ; राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित,...

वाल्हेकरवाडी प्रभाग १७ मध्ये अजितदादांची प्रचार सभा ; राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित, मतदारांमध्ये प्रचंड उत्साह

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये निवडणूक प्रचाराने जोर पकडला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची भव्य जाहीर सभा होत असून, या सभेकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.

ही जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनीषा आरसुळ ,भाऊसाहेब भोईर, शोभा वाल्हेकर आणि शेखर चिंचवडे, यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि विकासाभिमुख राजकारणामुळे प्रभागात राष्ट्रवादीच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष केलेल्या विकासकामांचा ठोस दाखला देत प्रचार केल्यामुळे मतदारांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकताना दिसत आहे. भाऊसाहेब भोईर हे प्रभाग १७ मध्ये विश्वासाचे प्रतीक बनले असून, शेखर चिंचवडे यांचा आक्रमक प्रचार, शोभा वाल्हेकर यांनी महिलांमध्ये निर्माण केलेला विश्वास आणि मनीषा आरसुळ यांचा तळागाळाशी असलेला थेट संपर्क हे पक्षाच्या ताकदीचे मुद्दे ठरत आहेत.

अजित पवार यांच्या जाहीर सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला निर्णायक बळ मिळणार असून, प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याची चर्चा मतदारांमध्ये जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments