Wednesday, June 19, 2024
Homeताजी बातमीअजित पवारांचा निर्णय हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी…..

अजित पवारांचा निर्णय हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी…..

अजितदादाना क्लीन चिट नाही चौकशी चालू आहे श्रीकांत भारतीय यांचा प्रतिपादन…

प्रतिनिधी पिंपरी: अजित पवारांनी राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतलेला निर्णय आहे.याआधी शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित,हेच ध्येय होते.असे प्रतिपादन आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे महासचिव व विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हे पत्रकारांशी बोलत होते,यावेळी पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,नगर सदस्य मोरेश्वर शेडगे,राजू दुर्गे,राजेश पिल्ले,क्षितिज गायकवाड आदी उपस्थित होते.राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, घेतलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा अजेंडा असेल तर,तो निर्णय जनता नक्कीच स्वीकारते.अजित पवार राज्यातील सत्तेत सामील होत असताना.सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.त्याचबरोबर नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे,असे दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्त्वाचे ठरते.

२०१४ ते २०१९ च्या सरकारने केलेल्या कामगिरीवर निवडणुकीत जनतेने कौल दिला होता.२०१९ ला सत्तेत आलेले सरकार हे न्याय तत्वाचे सरकार नव्हते,त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार यावे यासाठी प्रयत्न झाले व तसेच सरकार सत्तेत आले आहे.

श्रीकांत भारतीय एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, “आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही,तेच इकडे आले आहेत”. अजित पवारांच्या सिंचन घोटाळा बाबतच्या आरोपाबाबत बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, मुळात अजित पवार भारतीय जनता पार्टीत आले नाहीत, तर त्यांचा पक्ष सरकार मध्ये सहभागी झाला आहे.सिंचन घोटाळ्यातून कोणताही क्लीन चीट अजित पवार यांना देण्यात आला नसून त्याबाबत चौकशी चालू आहे.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने यावेळी चांगली कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकहितवादी पुरस्कार देऊन आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते गौरविले. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस (निरीक्षक) राजेंद्र निकाळजे व पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी व साहित्यिक वि.रा.मिश्रा यांचा यावेळी गौरव करण्यात आला.या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की,दर महिन्याला असा पुरस्कार पत्रकार संघ देणार हे कौतुकास्पद आहे.पत्रकार संघाचा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास आहे.हे यातून सिद्ध होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ हे होते.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे,वि.रा.मिश्रा,अतुल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अरुण कांबळे,आभार प्रदर्शन गोविंद वाकडे,तर सूत्रसंचालन माधुरी कोराड यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments