Monday, June 15, 2026
Homeताजी बातमीउपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना सुनावलं … चांगल्याला चांगलं म्हणा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना सुनावलं … चांगल्याला चांगलं म्हणा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. जे आवडले नाही, ते तिथल्या तिथे बोलून मोकळे होणार मग ते अधिकारी असो वा पक्षातील सहकारी.. अजित पवार यांचा हाच अंदाज पुण्यात पाहायला मिळाला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विकासकामांच्या आणि उपक्रमांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समारंभ संपन्न झाला. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व देहू रोडवरील पोलीस विश्रामगृह या इमारतींचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.

फडणवीसांसमोरच अजितदादांनी महेश लांडगे यांना सुनावले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सुनावलं. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकीर्दीत झाला पण माझं नाव घ्यायला महेशला काय झाले? शेवटी आपण महायुतीत आहोत, हे याद राखा, अशा शब्दात अजित पवार यांनी महेश लांडगे यांना खडसावले.

चांगल्याला चांगलं म्हणा, आपण महायुतीत आहोत, हे लक्षात ठेवा…

सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकीर्दीत झाला. आज जे काही चांगल्या गोष्टी दिसतायेत, त्या आम्ही त्याकाळात काम केल्याने दिसतायेत. मात्र तरीही महेश माझे नाव घेत नाही. माझे नाव घ्यायला अडचण काय आहे, अशी विचारणा करीत आपण महायुतीत आहोत, अशी युतीधर्माची आठवण अजित पवार यांनी महेश लांडगे यांना करून दिली. तसेच चांगल्याला चांगले म्हणायला हवे, असा सल्लाही त्यांनी लांडगे यांना दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments