Tuesday, September 10, 2024
Homeबातम्याअजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार…? सुत्रांची माहिती

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार…? सुत्रांची माहिती

सत्तानाट्यानंतर ज्यात लवकरच पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांची आदला बदल होणार असल्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांना पुण्याचं पालकमंत्री करा, अशी मागणी केली जात होती. त्यांना पुणे जिल्ह्याची जाण आहे. त्यामुळे त्यांनाच पालकमंत्री करावं, अशी मागणी होत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर अजित पवार पालकमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली. यावरच आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. पाटील यांना दुसऱ्या जिल्ह्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं तर पुण्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून चंद्रकांत पाटलांनाच पालकमंत्री ठेवा, असा सूर भाजपचा आहे. मात्र अजित पवारांना पालकमंत्री पद दिलं तर चंद्रकांत पाटलांकडे कोणत्या राज्याची जबाबदारी येणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्यासोबतच राज्यातील काही जिल्ह्यांचेदेखील पालकमंत्र्यांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे.

अनेकांचा अजित पवारांना पाठिंबा
अजित पवारांच्या बंडानंतर पुण्यातील मोठा गट हा अजित पवारांच्या पाठिशी आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटाची बैठक पार पडली या बैठकीला सगळ्या तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीदेखील अजित पवारांच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली, मुळशी, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी सहकारी संस्थांपासून तर कात्रज कमिटीपर्यंत सगळ्यांचाच अजित पवारांना पाठिंबा आहे.

भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्यापेक्षा आपला गट मजबूत करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे आहे. अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष पुण्याकडे असते. विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांना अजित पवारच पालकमंत्री हवेत. मात्र या मागणीला भाजपकडून विरोध होऊ शकतो. भाजपकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आहे. त्यामुळे भाजपकून हे पालकमंत्री पद गेलं तर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुण्याचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

कोणाला कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी मिळू शकते… ?

भंडारा गोंदिया – अत्राम

छगन भुजबळ – नाशिक

अजित पवार – पुणे

धनंजय मुंडे – बीड

हसन मुश्रीफ – कोल्हापूर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments