Monday, May 12, 2025
Homeगुन्हेगारीअजितदादांनी शब्द दिला अन् आरोपीला अटक , विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची बदनामी...

अजितदादांनी शब्द दिला अन् आरोपीला अटक , विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्याला अटक


५ मार्च २०२१ ,
विधानसभेचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जगतापनगर, थेरगाव येथे मंगळवारी (दि. २) हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ४) गुन्हा दाखल झाला. 

युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करून आरोपीने त्याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केला. त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी आरोपी दाखले यांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments