Friday, June 13, 2025
Homeगुन्हेगारीजितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका….

जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका….

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आज राज्यात सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबल्या जात असेल, तर ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं नाही, असे ते म्हणाले.

“काल ठाण्यात झालेल्या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात कुठेही विनयभंग झाल्याचे दिसत नाही. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री गाडीत बसले असताना तिथून १० फुटाच्या आत ही घटना घडली आहे. गर्दीतून पुढे जात असताना एखाद्याला बाजूला करणे, हा कोणता विनयभंग आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे होती”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

“काही दिवसांपूर्वीच छटपुजेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेचा उल्लेख आव्हाड यांनी ‘बहिण’ असा केला होता. त्याचाही व्हिडिओ पुढे आला आहे. त्यामुळे राज्यात अशा प्रकारे राजकारण होत असेल, तर लोकशाही, नियम, संविधान, घटना यासर्वांना तिलांजली देण्याचा हा प्रकार आहे” , असेही ते म्हणाले.

“आज राज्यात सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबला जात असेल तर ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं नाही”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.दरम्यान, “कोणाच्या सांगण्यावरून त्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे? याचा सुत्रधार कोण आहे? हे लवकरच समोर येईल. यामागे एक षडयंत्र आहे. अशी षडयंत्र रचून शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दुषित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असेल, तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जातीने यात लक्ष घातले पाहिजे”, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments