Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीअजित पवार व इतर बंडखोर कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं..

अजित पवार व इतर बंडखोर कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पक्षातून बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या फोटोला काळं फासलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत उभी फूट पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतील पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP Activist) घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पक्षातून बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या फोटोला काळं फासलं.

राज्यात आज, अजित पवार यांच्या नेतृत्त्वातखालील आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राज्यातील वेगवान घडामोडींमुळे अनेक चर्चांना उधाण आले. अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर असलेल्या बॅनरवरील बंडखोर नेत्यांच्या फोटोला काळं फासलं. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, अजित पवार, सुनिल तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सेल प्रमुख, युवक, युवती, महिला या पक्षासोबतच आहेत. आजच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले. आजचा शपथविधी हा ‘ऑपरेशन लोटस’चाच भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

अजित पवारांचा राष्ट्रवादीवर दावा
शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा निर्णय वरिष्ठांची चर्चा करुनच घेतला असल्याचे सांगितले. अजित पवारांच्या या निर्णायाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे का ? असा सवालही यामुळे उपस्थित झाला आहे. अजित पवार यांच्या बंडावर अद्याप शरद पवारांची कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही सांगितले. राज्याचे हित पाहून निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहेत. पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहोत. नागालँडला निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपबरोबर गेल्गेला आहे. काही जण आरोप करतील, साडे तीन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. तेव्हा मविआनं काम केलं. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो. पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments