१८ डिसेंबर
वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्ड याने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. गेल्या १५ वर्षापासून भारतीय संघाने घरच्या मैदानावर द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. इतक नव्हे तर भारतीय संघाना आतापर्यंत कधीच पाच वनडे सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर या दोन्ही गोष्टी इतिहास जमा होतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे तीन सामने भारताने गमावले होते. तर वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना भारताने गमावला आहे.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय
RELATED ARTICLES