Friday, December 6, 2024
Homeताजी बातमीसत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रथमच सोमवारी पुण्यात…

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रथमच सोमवारी पुण्यात…

सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारसमोरचा मोठा अडथळा दूर झाला. या पार्श्वभूमीवर सरकारने आता पुन्हा विकासकामांचा धडाका लावण्यास सुरुवात केली असून, येत्या सोमवारी (१५ मे) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुण्यात येणार आहेत. या वेळी काही विकासकामांची उद्घाटने अन् काहींचे भूमीपूजन होणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पुण्यातील हा पहिलाच मोठा कार्यक्रम असल्याने या वेळी शक्तिप्रदर्शनही घडविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

शहरात उभारण्यात येणारे दोन पूल, सूस म्हाळुंगे येथील समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि बाणेर-बालेवाडी येथील समान पाणीपुरवठा योजनेचे उद्‍घाटन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदान येथे सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल.

विकासकामांचा देणार चालना

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून पालिकेवर प्रशासक राज आल्याच्या घटनेला आता सव्वा वर्ष उलटले आहे. महापालिकेच्या निवडणुकांची कुठलीही चिन्हे नाहीत. त्यातच खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुण्याच्या लोकसभेची जागा रिक्त आहे. त्यासाठी पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • युतीच्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा

दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या राज्य सरकारच्या सत्तासंघर्षाचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे. या निकालामुळे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र, प्रत्यक्ष शिंदे-फडणवीस या निकालानंतर पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा अद्याप स्पष्ट नाही. पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे; तसेच भाजप शहराध्यक्ष बदलाचीही चर्चा जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने शिवसेना-भाजप युतीतर्फे शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments