Sunday, August 16, 2026
Homeगुन्हेगारीप्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे मुठा घाटात फेकले, तब्बल १२ दिवसांनी खुनाचा प्रकार...

प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे मुठा घाटात फेकले, तब्बल १२ दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस

२५ ऑगस्ट २०२१,
प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरुन फेकणाऱ्या प्रियकराला पुण्यात अटक करण्यात आली आहे. तब्बल बारा दिवसांनंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. तीस वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी ४० वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.हनुमंत अशोक शिंदे (वय ४० वर्ष, रा. बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय ३० वर्ष, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हनुमंतने प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर ते पोत्यात भरुन पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिले होते.

१२ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास नारायण पेठ परिसरात खुनाची घटना घडली होती. तब्बल १२ दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला. प्रियकराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments