Thursday, February 6, 2025
Homeताजी बातमी इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर, या 76 गावांना धोक्याचा इशारा..!!

 इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर, या 76 गावांना धोक्याचा इशारा..!!

भूस्खलनचा धोका असलेल्या देशातील 147 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. कोल्हापूरमधील 76 गावांना भूस्खलनचा धोका असल्याचं समोर आलं आहे.

मुसळधार पाऊस सुरू झाला की अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशीच घटना रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथे बुधवारी रात्री घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत 228 लोकसंख्येची पूर्ण वस्तीच मातीच्या मलब्याखाली गाडली गेली. अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर यात 10 हून अधिकांचा मृत्यूही झाल्याचं समोर येत आहे. अशातच आता कोल्हापूरकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

भूस्खलनचा धोका असलेल्या देशातील 147 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. कोल्हापूरमधील 76 गावांना भूस्खलनचा धोका असल्याचं समोर आलं आहे. इस्रोने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. भूस्खलनचा धोका असलेल्या गावांमध्ये राधानगरीमधील 31 शाहूवाडी 20 तर भुदरगड तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे.

या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केली. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना स्थलांतरीत होण्याबाबतच्या सूचना देणाऱ्या नोटीस प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस झाला की कोल्हापूरात अनेक ठिकाणी दरडी कोसळणं, भूस्खलन आणि रस्ते खचण्यासारख्या घटना घडत असतात. पावसाळा सुरू होताच जिल्हा हायअलर्टवर असतो.

त्यातच आता रायगडच्या भीषण घटनेनंतर कोल्हापूरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नोटीस पाठवण्यात आलेल्या नागरिकांचं लवकरात लवकर स्थलांतर होणं गरजेचं आहे. कारण रायगडनंतर आता कोल्हापुरमधील 76 गावं भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यांना योग्य वेळेत स्थलांतरित करणं गरजेचं आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments