२० ऑक्टोबर २०२०,
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीच्या चेन्नई संघाला सोमवारी सातव्या पराभवास सामोरं जावं लागलं आहे. दहा सामन्यात चेन्नईच्या नावावर फक्त सहा गुण आहेत. आयपीएलच्या इतिहासातील चेन्नईची ही सर्वात खराब कामगिरी आहे. धोनीच्या चेन्नईच्या प्ले-ऑफमधील आशा जर-तर वर अवलंबून आहेत. यापुढील चारही सामन्यात धोनीला मोठी पावलं उचलण्याची गरज आहे. राजस्थानविरोधात पराभव झाल्यानंतर बोलताना धोनीनं तशी हिंटही दिली आहे.

चेन्नईचा संघ आतापर्यंत प्रत्येक आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळला आहे. तीन वेळचा विजेता आणि पाच वेळचा उपविजेता असलेल्या चेन्नईला १३ व्या हंगामात आपल्या लौकिकास कामगिरी करता आली नाही. चेन्नईला दहा सामन्यापैकी फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. सहाव्या पराभवानंतर बोलताना धोनी म्हणाला की, ‘प्रत्येकवेळा परिणाम आपल्या बाजूने असतील असं नाही. नेमकं कुठं चुकलं याचा अभ्यास करायला हवा. आपली प्रक्रिया आणि सामन्यातील निर्णय नेमकं कुठे चुकलं हे पाहायला हवं. वेगवान गोलंदाजाला मदत मिळत होती. पीच महिल्या डावांप्रमाणे नव्हतं. त्यामुळे आधी वेगवान गोलंदाजाचा वापर केला. पीचवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नव्हती’
लागोपाठ होणाऱ्या पराभवानंतरही संघात फारशे बदल न करण्यावर धोनी म्हणाला की, ‘संघात जास्त बदल नसावेत. कारण संघ संतुलित असेल तर कामगिरी चांगली होती. तसेच तीन-चार-पाच सामन्यात आपले खेळाडू सुनिश्चित व्हायला हवेत. संघात असुरक्षितता नसावी.’
Amazon Brand – Symbol Crepe Wrap Dress
तरुणांना कमी संधी देण्यावर बोलताना धोनी म्हणाला की, ‘हे खरेय की यावेळी आम्ही तरुणांना कमी संधी दिली. असेही असू शकते की, तरुण खेळाडूंमध्ये ती चमक आम्हाला दिसली नसेल. पुढील काही सामन्यात आम्ही त्यांना संधी देऊ शकतो आणि तेही कोणत्याही दबावाशिवाय खेळतील.’
असा रंगला सामना –
चेन्नईविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने नावाप्रमाणेच रॉयल विजय मिळवत आपले स्पर्धेतील आव्हाना जिवंत ठेवले. चेन्नईच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत अत्यंत सुमार कामगिरी केली होती. राजस्थानच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे CSKला २० षटकांत ६ बाद १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. १२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली होती, पण जोस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी आपला अनुभव पणाला लावत संयमी खेळ करून सामना जिंकला. बटलरने नाबाद अर्धशतक ठोकले. या विजयासह राजस्थानने ८ गुणांसह आठव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली.