Monday, May 12, 2025
Homeताजी बातमी‘स्कॅम 1992’ सिक्वेल ‘स्कॅम 2003…’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘स्कॅम 1992’ सिक्वेल ‘स्कॅम 2003…’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज खूप गाजली. 1992 सालच्या भारतातल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारीत ही वेबसीरीज होती. यानंतर आता अश्याच अजून एका घोटाळ्यावर नवी वेबसीरीज येणार असल्याची घोषणा सोनी लिव्हने केली आहे.

ही वेबसीरीज ‘स्कॅम 1992’चा सिक्वेल असेल ज्याचं नाव सध्या तरी ‘स्कॅम 2003: द क्युरीयस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ असं असल्याचं कळत आहे. ही नवी वेबसीरीज असणार आहे 2003 च्या स्टँप पेपर घोटाळा प्रकरणावर. या सीरीजसाठी दिग्दर्शन हंसल मेहता यांचं असणार आहे. ही तेलगी स्टोरी पत्रकार संजय सिंग यांच्या ‘रिपोर्टर की स्टोरी’ या पुस्तकावर आधारीत असणार आहे. संजय यांनीच हा 2003 सालचा घोटाळा समोर आणला होता.

या घोटाळ्याचे धागेदोरे भारतातल्या अनेक शहरांमध्ये पसरलेले होते. साधारणपणे 20 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. या वेबसीरीजचं लेखन अनेक मराठी चित्रपटांचे लेखक किरण यज्ञोपवित हे करत आहे. याच वर्षी या वेबसीरीजचं चित्रीकरण सुरु होणार आहे. यातील कलाकारांची माहिती अजून मिळाली नाही. पण प्रेक्षकांची उत्सुकता आत्तपासूनच शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments