Saturday, April 11, 2026
Homeताजी बातमीतरुणाची हत्या करून मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला होता, ३ वर्षांनंतर धक्कादायक खुलासा

तरुणाची हत्या करून मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला होता, ३ वर्षांनंतर धक्कादायक खुलासा

११ फेब्रुवारी २०२१,
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या घटनेचा उलगडा केला आहे. तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह तळेगाव-दाभाडे परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात फेकून दिला होता. या प्रकरणी आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी अन्य प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. दोघांनी चौकशीदरम्यान या गुन्ह्याची कबुली दिली होती. निगडी येथील सहदेव सोलंकी याची अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हत्या केली होती. १२ ऑगस्ट २०१८ रोजी ही हत्या झाली होती. आरोपीकडून वारंवार त्रास दिल्याच्या रागातून त्याच्या हत्येचा कट रचला होता, असे आरोपींनी चौकशीत सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, शंकर शिंदे, रवी मोरे या दोघांना अटक करण्यात आली. अमोल वाले आणि मेघराज वाले या दोघांना अन्य एका गुन्ह्यात आधीच अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीदरम्यान, या हत्येचा उलगडा झाला. सोलंकीला एका गुन्ह्यात जामीन मिळाला होता. त्यानंतर तो आरोपींना त्रास देत होता. १२ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांनी सोलंकीला बोलावले. त्याला दारू पाजली. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला आरोपींनी तळेगाव दाभाडे येथे नेले. तेथे त्याचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी सोलंकीच्या मृतदेहाला दगड बांधून नदीपात्रात फेकून दिले. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपींना शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments