राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतंं. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांचं मेडिकल होणार….
नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी जेजे रुग्णालयात पोहोचेले आहेत. जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येईल. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई सेशन कोर्टातील बंदोबस्त वाढला…
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सध्या मेडिकल करण्यात येत आहे. दुसरीकडे मुंबई सेशन कोर्टातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पहाटे साडे चार वाजता ईडीच्या गाड्या त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. पावणे आठच्या सुमारास नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणलं होतं. त्यानंतर जवळपास आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली


