Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्व६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे… ! एअर इंडिया ही कंपनी आता...

६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे… ! एअर इंडिया ही कंपनी आता टाटा खरेदी करणार

१ ऑक्टोबर २०२१,
सरकारी कंपनी असलेली एअर इंडिया ही कंपनी आता टाटा खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा समूहाची निवड केली आहे. टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटचे अजय सिंग यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती. अहवालानुसार, सरकार लवकरच याची घोषणा करू शकते. जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान विमान सेवा बंद करण्यात आली होती. जेव्हा विमानसेवा पुन्हा सुरू झाली, तेव्हा २९ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर, १९४७ मध्ये एअर इंडियाचा ४९ टक्के सहभाग सरकारने आपल्या ताब्यात घेतला. आणि १९५३ मध्ये त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

एअर इंडियाकडे एकूण किती मालमत्ता आहेत?
३१ मार्च २०२० पर्यंत एअर इंडियाची एकूण स्थिर मालमत्ता सुमारे ४५,८६३.२७ कोटी रुपये आहे. यामध्ये एअर इंडियाची जमीन, इमारती, विमानांचा ताफा आणि इंजिनांचा समावेश आहे.सरकारने संसदेमध्ये सांगितले होते की, मार्गदर्शक तत्वांच्या आधारे, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल. तसेच, त्यांना देखील पूर्णपणे सुरक्षित ठेवले जाईल.

६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे…
एअर इंडिया पूर्वी टाटा समूहाची कंपनी होती. या कंपनीची स्थापना जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये केली होती. स्वातंत्र्यानंतर उड्डाण क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण झाले आणि त्यामुळे सरकारने टाटा एअरलाइन्सचे ४९ टक्के शेअर्स खरेदी केले. त्यानंतर ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि २९ जुलै १९४६ रोजी कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले. १९५३ मध्ये सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि कंपनीचे संस्थापक जेआरडी टाटा यांच्याकडून मालकी हक्क विकत घेतले. यानंतर, कंपनीला पुन्हा एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे नाव देण्यात आले. आता ६८ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा समूहाने स्वतःची कंपनी परत मिळवणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments