Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीस्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अॅड. नितीन लांडगे; राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकरांचा पराभव

स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अॅड. नितीन लांडगे; राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकरांचा पराभव

पिंपरी, ता. 5ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या नितीन लांडगे यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांचा ५ मतांनी पराभव केला. लांडगे यांना १०, तर भालेकर यांना ५ मते मिळाली. स्थायी समिती सभापतीदासाठी भाजपकडून नितीन लांडगे आणि राष्ट्रवादीकडून प्रवीण भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ‘सांगली पॅटर्न’ घडवण्याचे स्वप्न बघीतले होते. परंतु, तसे काही झाले नाही.

निवडणुकीत भाजपच्या नितीन लांडगे यांना १०, तर भालेकर यांना ५ मते मिळाली. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदी नितीन लांडगे यांची निवड झाल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले. दरम्यान, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी स्थायी समिती सभापतीपद देण्याचा शब्द न पाळल्यामुळे या समितीचे सदस्य असलेल्या रवि लांडगे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा अद्यापपर्यंत स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे रवि लांडगे स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला उपस्थित राहतात की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र ते निवडणुकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे नितीन लांडगे यांचे एक मत कमी झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे 10, अपक्ष 1 असे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 असे 16 सदस्य  आहेत. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments