निगडी प्राधिकरण सेक्टर 26 येथिल सेंट ॲन्स् एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सेंट मेरीज स्कुलमध्ये (सीबीएसई पेंटर्न) शैक्षणिक वर्ष 2022 – 23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि इयत्ता पहिलीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रशस्त इमारत उभारण्यात आली असून या ठिकाणी प्रशस्त खेळाचे मैदान, इन डोअर – आऊट डोअर गेम, ई – लर्निंग, लायबॅरी, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही, अग्नीशामक सुविधा, स्वच्छ पाणी पुरवठा, बस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी (दि. 10 डिसेंबर) फादर पिटर आणि फादर सायमन यांनी शुभवार्ता प्रार्थना करुन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन सी. जे. फ्रान्सिस, सचिव ॲनी फ्रान्सिस, व्यवस्थापिका मधुबाला गैरोला आणि पालक उपस्थित होते. पुढील कालावधीत टप्प्या – टप्प्याने बारावीपर्यंतचे वर्ग वाढविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी पालकांनी व्यवस्थापिका मधुबाला गैरोला यांच्याशी 020-27654001 — 9833845303. संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.