Thursday, February 6, 2025
Homeताजी बातमीआतापर्यंतच्या मताधिक्याचे सर्व विक्रम तोडून विजयी होणार आढळराव-पाटील यांचा दावा

आतापर्यंतच्या मताधिक्याचे सर्व विक्रम तोडून विजयी होणार आढळराव-पाटील यांचा दावा

रस्ते, रेल्वे प्रकल्पांसाठी ५० हजार कोटींचा निधी आणून हे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. प्रकल्पपूर्ती करूनच पाच वर्षांनी थांबायचे, या हेतूने कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य केल्याचे स्पष्टीकरण शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिले. लोकसभेची आपली शेवटची निवडणूक असल्याचे आढळराव-पाटील यांनी जाहीर केले. त्यावरून आढळराव भावनिक प्रचार करत असल्याची टीका शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. त्यावर निधीतून प्रकल्प पूर्णत्वासाठी शेवटची निवडणूक असल्याचे मी म्हटले. माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकता हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हे यांनी काढल्याचे प्रत्युत्तर आढळराव यांनी दिले.

पहिल्या निवडणुकीत ८० हजार, दुसऱ्या निवडणुकीत पावणे दोन लाख, तिसऱ्या निवडणुकीत तीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो आहे. गेल्या निवडणुकीत अपघाताने पराभव झाला. यावेळी पुन्हा निवडणूक लढवत आहे. यंदा माझ्या आतापर्यंतच्या मताधिक्याचे सर्व विक्रम तोडून विजयी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, भोसरी विधानसभेतून जास्तीत-जास्त मताधिक्य आढळराव यांना दिले जाईल. त्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आढळराव-पाटील यांनी शनिवारी भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. मोशी गावठाण येथील श्री नागेश्वर महाराज मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. माजी नगरसेवक वसंत बोराटे, कामगार नेते इरफान सय्यद, नितीन सस्ते त्यांच्यासोबत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments