नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 कार्यक्रमात पीसीएमसीच्या इंग्लिश विषयाच्या नामांकित शिक्षिका आणि ऑनलाइन सर्विसेस मुळे जगभरात आपली उत्कृष्ट शिक्षण शैली पोहोचवणाऱ्या डॉक्टर स्मिता सातारकर यांना भारत विकास प्रबोधिनी शांतिदूत एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी चे संस्थापक श्री विजुभाऊ इंगळे यांच्या हस्ते भव्य ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्हे आणि मेडल देऊन नाशिक येथे आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात नुकतेच गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला डॉक्टर उज्वला, विजुभाऊ इंगळे, मिसेस इंडिया विजेत्या सुमेधा तिळवणकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर डॉक्टर स्मिता सातारकर यांनी सर्वांचे आभार मानले व या पुरस्काराचे खरे मानकरी त्यांचे विद्यार्थी आहेत असे सांगितले. इंग्रजी भाषा शिकवताना जो आनंद मला मिळतो त्या आनंदात उद्याच्या भारताची प्रगती सामावलेली आहे याचा मला जास्त आनंद असतो त्यामुळे हा पुरस्कार माझ्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारा आहे पुढे जाऊन मी पिंपरी चिंचवड शहरातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचे ज्ञान त्यांना मिळवून देण्यासाठी कुठलेही शुल्क न घेता नक्की प्रयत्न करेल. मला मिळालेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड करांचा बहुमान असल्याचे आपल्या भाषणामध्ये डॉक्टर स्मिता सातारकर म्हणाल्या.