Friday, June 13, 2025
Homeअर्थविश्वNDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुकर; संस्थापक-प्रवर्तक प्रणय आणि राधिका रॉयचा राजीनामा…

NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुकर; संस्थापक-प्रवर्तक प्रणय आणि राधिका रॉयचा राजीनामा…

एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमधून प्रवर्तक पदाचा राजीनामा दिला आहे. प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्याची माहिती एनडीटीव्हीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. प्रणय आणि राधिका यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले असून आजपासूनत ते पदावरुन पायउतार झाले आहेत. या नवीन घडामोडींमुळे माध्यम विश्वात खळबळ उडाली आहे.

कंपनीकडून निवेदन जाहीर
प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीकडून याबाबत एक निवेदनात जाहीर करण्यात आले ज्यात म्हटले की आरआरपीआरएचने सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया, सेंथी सिन्निया चेंगलवरायन यांची तात्काळ प्रभावाने बोर्डाचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी संजय फुगलिया हे वरिष्ठ पत्रकार असून टीव्ही क्षेत्रात काम करण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव असून वेगवेगळ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या संपादकपदी आणि वरिष्ठपदी त्यांनी यापूर्वी कामही केलं आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) ने एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी RRPR ची ९९.५ टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. VCPL ही एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे, ज्यामध्ये १००% हिस्सा अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडे आहे. NDTV च्या नवीन मंडळाने RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळावर संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगलवरायन यांची तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. यासह अदानी समूहाकडे एनडीटीव्हीची मालकी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेअर्स VCPL मध्ये हस्तांतरित
एनडीटीव्हीच्या प्रवर्तक कंपनीनुसार, त्यांनी तिच्या इक्विटी कॅपिटलपैकी ९९.५ टक्के अदानी समूहाच्या मालकीच्या VCPL मध्ये हस्तांतरित केले आहे. यासह आता अदानी समूहाला एनडीटीव्ही मधील २९.१८ टक्के हिस्सा मिळेल. त्याच वेळी, अदानी समूहाने एनडीटीव्हीमधील आणखी २६ टक्के हिस्सा खरेदीसाठी बाजारात ओपन ऑफर आली आहे. अदानी समूहाने अतिरिक्त २६ टक्के भाग खरेदीसाठी ओपन ऑफर देखील दिली आहे, जी ५ डिसेंबर रोजी संपेल.

ऑगस्टमध्ये अधिग्रहणाची घोषणा
अदानी समूहाने ऑगस्टमध्येच विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. २००९ आणि २०१० मध्ये, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने एनडीटीव्हीच्या व्यवसाय प्रवर्तक आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडला ४०३.८५ कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते, ज्याच्या बदल्यात, एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के भागभांडवल कर्जदाराकडून कोणत्याही वेळी घेण्याची तरतूद करण्यात आली होती. आता अदानी समूहाच्या कंपनीने अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर देण्यात आली आहे.

अदानी म्हणाले ही एक जबाबदारी
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, एनडीटीव्ही खरेदी करणे ही व्यवसायाची संधी नसून त्यांची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य म्हणजे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणे आहे. त्यांनी म्हटले की सरकारने काही चुकीचे केले असेल तर ते चुकीचे आहे असे म्हणावे. दुसरीकडे सरकार काही चांगलं करत असेल तर त्याला चांगलं म्हणण्याची हिंमतही असायला हवी. यासोबतच त्यांनी एनडीटीव्हीचे मालक-संस्थापक प्रणय रॉय यांना पदावर कायम राहण्यासाठी आमंत्रित केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments