Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकअभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती…

अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माहिती दिली. तसेच विक्रम गोखले यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिरीष याडगीकर म्हणाले, “ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे. त्यांचा रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत.”

दरम्यान, शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत काहिशी सुधारणा झाली होती. त्यावेळी शिरीष याडगीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं, “विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत असून हात, पाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकेल असं वाटत आहे. त्यांचा रक्तदाब आणि ह्रदयाची क्रिया स्थिर आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments