तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आता सुरुवात झाली आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी या आणि अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी कोरोना लस घेतली आहे. यात याता सिनेसृष्टीतील कलाकारही लस घेत असल्याचे दिसत आहेत. 60 वर्षांवरील आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील सहव्याधी असणाऱ्यांना या टप्प्यात लस देण्यास सुरुवात झाली आहे.
साऊथ सुपरस्टार कमल हसन आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्यानंतर आता बॉलिवूड स्टार सैफ अली खाननेही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. फोटोग्राफर वरिंदर चावलाने सैफचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 50 वर्षीय सैफ अली खानने आज करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्याने खाकी रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा टी-शर्ट असा पोशाख परिधान केला होता आणि तो रांगेत उभा राहून करोना लस घेण्याची प्रतिक्षा करत होता.
यापूर्वी लस घेतलेले अभिनेते कमल हसन आणि सतीश शाह यांनी लस घेतली आहे. सतीश शाह यांनी सांगितलं की, ही लस घेण्यासाठी त्यांना 3 तास उन्हात उभं राहून वाट पाहायला लागली होती. तर कमल हसन यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.