Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीदुःखद बातमी! राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दुःखद बातमी! राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेते राजीव कपूर यांचे मंगळवारी (9 फेब्रुवारी) निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 58 वर्षीय राजीव यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीव कपूर यांना इनलिंक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूरही रुग्णालयात आले होते. लाखो प्रयत्न करूनही डॉक्टर राजीव यांचा जीव वाचवू शकले नाहीत. ‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटांतून ते प्रसिद्ध झाले होते.

अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा देत, ‘मी माझा छोटा भाऊ गमावला आहे. राजीव आता या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना वाचवता आले नाही,’ अशी दुःखद प्रतिक्रिया दिली आहे. राजीव कपूर यांचा फोटो शेअर करताना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांनी ‘रेस्ट इन पीस’, असे म्हटले आहे.

हे ही वाचाः Video: काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांबद्दल बोलताना मोदी भावूक, पाहा का झाले मोदींना अश्रू अनावर

राजीव कपूर यांनी आपल्या करिअरची सुरूवात ‘जिम्मेदार’ या चित्रपटातून केली होती. त्यांना खरी ओळख राज कपूर दिग्दर्शित 1985मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मिळाली. चित्रपटात राजीव यांच्यासोबत अभिनेत्री मंदाकिनी मुख्य भूमिकेत झळकली होती. या दोघांनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. यानंतर ते आणखी काही चित्रपटांमध्ये झळकले होते. तसेच ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट राजीव कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनी ‘हिना’ आणि ‘आ अब लौट चले’ यासारख्या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments