महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा निर्णय घेतला. राज्यात रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) केला आहे. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचदरम्यान छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता करण पटेलने सोशल मीडिया पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे. करणची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत संताप व्यक्त केला. ‘अभिनेते त्यांच्या आगामी प्रोजेक्टसचे चित्रीकरण करु शकतात. दिवस असो वा रात्र क्रिकेटर्स त्यांचे सामने खेळू शकतात. राजकिय नेते हजारो लोकांसह प्रचारसभा काढू शकतात. निवडणूका होऊ शकतात आणि तुम्ही घराबाहेर पडून मतदान कराल अशी अपेक्षा बाळगली जाते पण एक सामन्य व्यक्ती कामाला जाऊ शकत नाही’ या आशयाची पोस्ट करणनने शेअर केली. त्यासोबतच त्याने #stupid #senseless असे हॅशटॅग वापरले आहेत.