Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकखाजगी रुग्णालयांनी डॅशबोर्ड अपडेट न केल्यास कारवाई होणार …

खाजगी रुग्णालयांनी डॅशबोर्ड अपडेट न केल्यास कारवाई होणार …

३१ मार्च २०२१,
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता कमी पडत असून खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. परंतु खाजगी रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत असल्याचे निदर्शनास येत असून खाजगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत, अशा सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या. यासंदर्भात, दररोज बेडची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर न करणा­-या खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त यांच्या दालनात महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर ‍हिराबाई उर्फ नानी घुले, नगरसेवक संतोष कांबळे, सतिश कांबळे, आयुक्त राजेश पाटील सर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, डॉ. राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे प्रतिनिधी डॉ. सतिष कांबळे यांनी कोरोना रुग्णांना भेडसावणा­-या समस्या, मनपा हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, खाजगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ उपाययोजना व भविष्यात लागणारे बेड, ऑक्सिजन, व्हेटिलेटर आदींची त्वरित उपलब्धता व्हावी, जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, कोवीड ॲब्युलन्स, लागणारे डॉक्टर इत्यादि विषयावर चर्चा करून महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला कोरोना परिस्थितीवर मात कशी करता येईल, यावर उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments