६ जुलै २०२१,
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याचे पडसाद सभागृहात उमटले होते. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विधान परिषदेच्या सभागृहातही विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. या प्रश्नावर स्थगन प्रस्तावाची मागणी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्यामुळे दिवसभरात आरक्षणासाठी सहा वेळा; तर सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आणखी दोनदा कामकाज तहकूब करावे लागले.
अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची चर्चा आहे. तर, सत्ताधारी पक्ष वीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याकडे लक्ष असणार आहे.
- मी गुन्हा केला नसेल तर राज्य सरकारने क्लीन चिट दिली पाहिजेः प्रताप सरनाईक
- माझ्यावर केलेले आरोप म्हणजे राज्य सरकारवर केलेले आरोपः प्रताप सरनाईक
- फोन टॅप होत असल्याचा नाना पटोलेंचा आरोप; गृहमंत्र्यांनी दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश
- आमचा डीएनए अजून त्यांना माहिती नाही; देवेंद्र फडणवीस मी बोलायला उभं राहणार म्हणून मार्शल पाठवून माईक जप्त केलेः देवेंद्र फडणवीस
- भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; स्पीकर, माईक ताब्यात घेतले
- परवानगी नसताना स्पीकर लावून भाषणं देत असल्याचा आरोप
- भाजपच्या प्रतिविधानसभेविरोधात आमदार भास्कर जाधव यांची तक्रार
- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला धिक्कार प्रस्ताव
- भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली भरवलेल्या प्रतिविधानसभेत सरकारच्या विरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला.
- सरकार बोलू देत नसल्याचा भाजपचा आरोप
- भाजपच्या सदस्यांनी प्रतिअधिवेशन भरवलं; विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार