Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रवाकडमधील दोन हुक्का पार्लरवर कारवाई

वाकडमधील दोन हुक्का पार्लरवर कारवाई

वाकड येथे हॉटेल स्पाईस फॅक्टरी आणि कस्तुरी चौकाजवळ असलेल्या हॉटेल सी डॉक या दोन हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हॉटेल स्पाईस फॅक्टरीचा मालक स्वप्नील डांगे (रा. पारखेवस्ती, वाकड) आणि तानाजी सयाजी देसाई (वय २८, रा. पारखे वस्ती, वाकड, मूळ – कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई दत्तात्रय शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकड येथे हॉटेल स्पाईस फॅक्टरी मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून कारवाई करत लोखंडी बार्बेक्यू इलेक्ट्रिक शेगडी, कोळसा, हुक्का साहित्य असा १५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

दुसरी कारवाई कस्तुरी चौकाजवळ असलेल्या हॉटेल सी डॉक मध्ये करण्यात आली. किशोर दिलीप काटे (वय ३८, रा. केयावनगर, पिंपळेसौदागर), अक्षय प्रभाकर कलाटे (वय २८, रा. विनोदेवस्ती, वाकड), दिनेश सुरेश काटे (रा. पिंपळेसौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक चंद्रकांत गडदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी त्यांच्या हॉटेल सी डॉकमध्ये हुक्का पार्लर चालवण्याचा कोणताही परवाना न घेता ग्राहकांना हुक्का पुरवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी ३३ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments