गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड याच्या टोळीवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. गणेश गायकवाड हा टोळीचा प्रमुख आहे. नानासाहेब शंकर गायकवाड यांच्यासह सहा जणांचा टोळीत सहभाग आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, अपहरण करून मारहाण, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, खंडणीसाठी मारहाण, दरोडा घालणे असे एकूण 14 गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल आहेत. सध्या या टोळीमधील सदस्य येरवडा कारागृहात विविध गुन्ह्यामध्ये अटक आहेत.
काय आहे प्रकरण.. ?
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगवी भागातील कुख्यात गुंड गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. गणेश गायकवाड हा टोळीचा म्होरक्या आहे. नानासाहेब शंकर गायकवाड यांच्यासह सहा जणांचा टोळीत सहभाग आहे.टोळीतील आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गुलाम बनवण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, खंडणीसाठी मारहाण, अनैसर्गिक संभोग करुन खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे असे एकूण 14 गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल आहेत. सध्या या टोळीमधील सदस्य येरवडा कारागृहात विविध गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत आहेत.