Sunday, June 15, 2025
Homeगुन्हेगारीपरिक्षेत गुण वाढवून देतो सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणारया आरोपी शिक्षकावर गुन्हा...

परिक्षेत गुण वाढवून देतो सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणारया आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल

१५ जुलै २०२१,
‘बारावीला परीक्षेतील गुण वाढवून देतो,’ असे म्हणून विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला संबंधित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी चोप दिला. त्यानंतर तोंडाला काळे फासून रस्त्याने धिंड काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एका नामांकित महाविद्यालयात हा प्रकार घडला.

अभिजित हरिभाऊ पवार (वय ३४, रा. वडगाव बुद्रुक) असे क्लार्कचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागात काम करतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क ते अंतर्गत मूल्यमापनातील गुण भरण्याचे काम त्याच्याकडे होते. त्यातूनच त्याने या विद्यार्थिनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी विद्यार्थिनी महाविद्यालयात गेली असता त्याने तिला गुण वाढवून देतो, असे सांगून तिच्याशी असभ्य वर्तन केले. तिच्या नकारानंतरही तो तिच्या मागेच लागला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी बुधवारी थेट महाविद्यालयात जाऊन पवारला जाब विचारून त्याची तोंडाला शाई लावून धिंड काढली. याचा व्हिडिओही शहरात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करून पवारला अटक केली. त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.

आरोपी पवार महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागात क्लार्क म्हणून काम करतो. त्याने गुण वाढवण्याच्या नावाखाली संबंधित तरुणीशी असभ्य वर्तन केले. कुटुंबीयांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे. – विजय टिकोळे, वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments