मयत सोन्या तापकिर याच्या खुनाच्या गुन्ह्यातील मास्टर माईंड कुख्यात सराईत आरोपी करण रोकडेसह तीन आरोपींना भारत-नेपाळ बॉर्डरवरुन गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले.
चिखली येथे राहणारा सोन्या तापकिर हा चिखली परीसरात वरचढ होईल व तो आपलाच काटा काढील या भितीने सराईत आरोपी करण रोकडे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कट रचुन सोन्या पानसरे व १ विधी संघर्षीत बालक यांच्याकरवी पिस्तुलाने गोळीबार करुन (दि. २२/०५/२०२३) रोजी खुन केला होता. या घटनेबाबत चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हयातील मास्टर माईड कुख्यात सराईत आरोपी करण रतन रोकडे (वय २५ वर्षे रा. आंबेडकर भवन समोर, चिंतामनीनगर, रोकडे वस्ती, चिखली), हा त्याचे आणखी ०३ साथीदार ऋत्विक ऊर्फ मुंग्या रतन रोकडे, रिंकु दिनेश कुमार (वय १९ वर्षे), विधी संघर्षीत बालक यांच्यासह गुन्हा घडल्यापासुन अटक चुकवण्यासाठी लोणावळा, गोवा, मध्यप्रदेश, गुजराथ व उत्तरप्रदेश या राज्यामध्ये राहण्याची ठिकाणे वेळोवेळी बदलून व स्वतःचे अस्तित्व लपवुन रहात होते.
गुंडा विरोधी पथकातील मयुर दळवी, सुनिल चौधरी व विजय तेलेवार यांच्या टिमला त्यांच्या बातमीदारामार्फत करण रोकडे बाबत माहीती प्राप्त झाली. सदर माहीतीच्या आधारे पोलीस अंमलदार शाम बाबा यांनी केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन आरोपी करण रोकडे हा मथुरा, उत्तरप्रदेश येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने व स्टाफ यांनी मथुरा, उत्तरप्रदेश येथे जावुन माहीती घेतली असता करण रोकडे हा मथुरे पासुन सुमारे ७५० किलोमीटर लांब भारत-नेपाळ बॉर्डर पासुन जवळ मधुवन, जि. मऊ राज्य उत्तरप्रदेश येथे असुन तो नेपाळ येथे पळुन जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहीती प्राप्त झाली. लागलीच गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी जावुन ते रहात असलेल्या इमारतीची माहीती करून सदर इमारतीला स्थानिक पोलीसांचे मदतीने वेढा घातला असता आरोपी करण रोकडे यास पोलीसांची चाहुल लागता तो त्याच्या ०३ साथीदारांसह पहील्या मजल्यावरुन उडी मारुन शेतामध्ये पळुन जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफिने पकडुन पिंपरी चिंचवड येथे आणुन त्यांना चिखली पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले.
त्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मोरवाडी कोर्ट पिंपरी पुणे येथे हजर करुन त्यांची दि.०६/०७/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ही कारवाई ही विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे एच. व्ही. माने, सहायक पोलीस निरीक्षक, सागर पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक (तांत्रीक विश्लेषण विभाग) तसेच पोलीस अंमलदार- हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयुर दळवी, रामदास मोहीते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसीफ शेख तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.